ऑर्डरची रक्कम कशी पाठवावी

आपणास बिल मिळाल्यानंतर आपण त्वरीत बिलाची रक्कम डी.डी. ने, कॅशने अथवा, ऑनलाईन ट्रान्सफर ने भरू शकता.

  • चेक्स / डीडी
  • कृपया पुणे येथे पेएबल असलेलेच चेक्स / डीडी पाठवावेत. चेक्स / डीडी Institute of Matter Test and Examination याच नावाने काढावेत. कृपया आपल्या येथील लोकल बँकांचे चेक पाठवू नयेत, ते क्लिअरिंग होत नाहीत अथवा त्याला जास्तीचा चार्ज पडतो. सदर लोकल चेकची रक्कम आम्हाला मिळण्यास १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. CTS क्लिअरिंगचेच चेक्स पाठवावेत.

  • कॅश पेमेंट
  • प्रश्नपत्रिका घ्यायला येण्यापूर्वी बीलाची संपूर्ण रक्कम घेऊनच प्रतिनिधींना पाठवावे.

  • ऑनलाईन पेमेंट
  • ज्या शाळा / महाविद्यालयांना ऑनलाईन पेमेंट करणे सोपे जात असेल अशांनी ते Institute of Matter Test and Examination च्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या नवीपेठ, पुणे येथील शाखेत खाते क्र. 60147280459 (IFSC Code – MAHB0000102) मध्ये बीलाचे पेमेंट करावे व त्यानंतर लगेचच आमच्या संस्थेस तसे कळवावे.