ऑर्डर कशी नोंदवावी

  • परिपत्रकात अकरावी – बारावीच्या सर्व परीक्षांसाठी एकच ऑर्डर फॉर्म दिलेला आहे. आपल्याला ज्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका हव्या आहेत त्या चौकोनात (✓) बरोबरची खूण करावी. तसेच आपण या वेबसाईटद्वारेही ऑर्डर नोंदवू शकता.
  • दहावी करिता स्वतंत्र ऑर्डर फॉर्म दिलेला आहे त्यामार्फतच ऑर्डर करता येईल.
  • सदर ऑर्डर फॉर्म शाळेच्या / महाविद्यालयाच्या सही व शिक्क्यानिशी संपूर्ण भरून पाठवावा. तसेच इमेल द्वारे ही आपल्याला ऑर्डर नोंदविता येईल.
  • सदर फॉर्ममध्ये शाळा / महाविद्यालयाचे संपूर्ण नाव, पिनकोड सहित संपूर्ण पत्ता, परीक्षा प्रमुखाचे नाव व फोन नं., प्रश्नपत्रीकांची विषयानुसार संख्या याचा उल्लेख असणे आवश्यक आहे. प्रश्न पत्रिका एस.टी. पार्सलने, कुरीअरने हव्या असल्यास तसे स्पष्टपणे नमूद करावे. समक्ष येऊन प्रश्नपत्रिका घेणार असल्यास तसेही नमूद करावे.
  • वेबसाईट द्वारे ऑर्डर रजिस्टर करताच आपणास आपण दिलेल्या मोबईल क्रमांकावर ऑर्डर कन्फर्मेशन चा एक एसएमएस पाठविण्यात येईल. त्यामध्ये आपल्याला वेबसाईट वरील आपली ऑर्डर पहाणे अथवा त्यामध्ये काही बदल हवा असल्यास करणे हे करता येईल. त्यासाठी संस्थेकडून एक युजर आयडी व पासवर्डही आपल्यास देण्यात येईल.