परीक्षा वेळापत्रक संदर्भात

Download Timetable

संस्थेने ११ वी , १२ वी चे वार्षिक नियोजन (Year’s Plan) तयार केलेला आहे. त्यानुसारच प्रश्नपत्रिका तयार केली जाते. तरी आपण सर्वांनी सदर नियोजनाचे काटेकोर पालन करावे.

वर्षभरातील परीक्षांचे अंदाजे नियोजन खालीलप्रमाणे :

  • प्रथम सत्रपरीक्षा (सप्टेंबर अखेर पर्यंतच्या अभ्यासक्रमावर) – साधारणपणे दिवाळी सुरू होण्यापूर्वी १ ते २ दिवस आधी परीक्षा संपेल अशा पद्धतीने सुरू होईल.
  • १२ वी सराव संच १ (संपूर्ण अभ्यासक्रमावर) – साधारणपणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून किंवा एचएससी बोर्ड परीक्षा सुरू होण्यापूर्वी तीन आठवडे संपेल असे वेळापत्रक राहील. या परीक्षेस इंग्रजी विषयाच्या A, B, C, D अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका असतील. सदर परीक्षेचे नियोजित वेळापत्रक आपणास आगोदर कळविले जाईल. कृपया सर्वांनी याच वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घ्यावी.
  • १२ वी सराव संच २ (संपूर्ण अभ्यासक्रमावर) – सदर सराव प्रश्नपत्रिका डिसेंबर महिन्यात उपलब्ध होतील. सदर सराव परीक्षेसाठी वेळापत्रकाचे बंधन नाही.
    या सरावास इंग्रजी A, B, C, D मध्ये उपलब्ध नाही.
  • English 3 Test Series – इंग्रजी विषयाच्या ८० मार्कांच्या तीन स्वतंत्र प्रश्नपत्रिका आहेत. A, B, C, D नाही. आर्टस्, कॉमर्स व सायन्स या तीनही शाखांसाठी उपलब्ध. या परीक्षेसाठी वेळापत्रक नाही.
  • ११ वि द्वितीय सत्र – इ. १० वीच्या बोर्डाच्या परीक्षा संपल्यावर लगेचच सुरू होतील.
  • १० वी सराव संच – दहावी करिता संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एसएससी बोर्डाच्या पॅटर्न प्रमाणे सर्व विषयांचे दोन संच डिसेंबर महिन्यात उपलब्ध होतील. मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम व इंग्रजी माध्यमांमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध. सामान्य गणित या विषयाचा समावेश (मराठी माध्यम) साठी केलेला आहे.