वितरण व्यवस्था

  • परीक्षेच्या वेळापत्रकाआधी आठ दिवस संस्थेच्या मुख्य कार्यालयातून आपण नमूद केल्याप्रमाणे एस्.टी पार्सल अथवा कुरीअरने प्रश्नपत्रिका पार्सलने पाठविल्या जातात. कृपया आपल्या येथे सेवा देत असलेल्या कुरीअर कंपनीचे नाव ऑर्डर फॉर्ममध्ये अवश्य कळवावे.
  • एस.टी. पार्सलचा डॉकेट नंबर आपणास एसएमएस द्वारे कळविला जातो.
  • पुणे येथून समक्ष प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या शाळा / महाविद्यालयांना परीक्षेच्या आधी ३ (तीन) दिवस संस्थेच्या कार्यालयात १२ ते ५ या वेळेत मिळतील. समक्ष प्रश्नपत्रिका घ्यायला येणाऱ्या शाळेच्या अथवा महाविद्यालयाच्या व्यक्तीबरोबर शाळेचे / महाविद्यालयाचे पत्र असणे आवश्यक आहे.
  • एस.टी. पार्सल दिलेल्या तारखेलाच पाठविले जातील.
  • कुरिअर सेवा आपल्या गावास उपलब्ध नसल्यास अन्यठिकाणी जेथे कुरीअर सेवा उपलब्ध आहे तेथे शाळेतील संबंधित व्यक्ति असल्यास त्यांचे नांव, पत्ता व मोबाईल क्रमांक द्यावा म्हणजे तेथे कुरीअर पार्सल पाठविता येईल.